शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रत्नागिरीच्या थिबा राजवाड्याची दुरूस्ती, कानउघाडणी होताच कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:23 AM

कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कामाला आता गती मिळाली असून, थिबा राजवाड्याला नवी झळाळी मिळून तो पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार आहे.

ठळक मुद्दे- कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी खुला नाही.- राजवाड्याच्या सुशोभिकरणाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी.- दुरूस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश.- पर्यटनासाठी खास आकर्षणाचे ऐतिहासिक स्थळ आहे.

रत्नागिरी : कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कामाला आता गती मिळाली असून, थिबा राजवाड्याला नवी झळाळी मिळून तो पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार आहे.थिबा पॅलेस हे पर्यटनाच्या दृष्टीने खास आकर्षणाचे ऐतिहासिक स्थळ आहे. ब्रिटिशांनी सन १८८५ मध्ये ब्रह्मदेशच्या राजाला स्थानबध्द करुन रत्नागिरीत आणले होते. त्याला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी सन १९१०मध्ये ३ मजली राजवाड्याची उभारणी केली. सन १९११ मध्ये थिबा राजा राजवाड्यात राहण्यासाठी गेल्याची इतिहासात नोंद आहे.

या राजवाड्यात थिबा व त्याच्या कुटुंबियांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यामुळे या ऐतहासिक वास्तुला पर्यटनाच्या नकाशावर अन्यन्यसाधारण महत्व आहे. ही ऐतहासिक वास्तू पाहण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक वारंवार भेट देत असतात. रत्नागिरीच्या पर्यटनस्थळांपैकी हे एक खास आकर्षण ठरते.

राज्य संरक्षित स्मारक जतन - दुरूस्ती योजनेतून राजवाड्याच्या छताच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. तसेच आतील लाकडी सामान त्यामध्ये खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्या आदी कामांसाठी १ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला. या मंजूर निधीतील छतदुरूस्तीचे काम पूर्णत्त्वाकडे गेले आहे. उर्वरित लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे सुरू आहेत.या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी काही महिन्यांपूर्वी राजवाड्याला भेट दिली होती. जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट दिल्याने पुरातत्व विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांची धावपळ उडाली. अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून दुरूस्तीच्या कामात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या गांभीर्याने लक्ष घालावे, अशी सक्त सूचना केली होती. त्यानंतर आता राजवाड्यातील अंतर्गत दुरूस्तीची कामे वेगाने सुरू झालेली दिसून येत आहेत.वास्तुच्या देखभाल व दुरूस्तीसाठी शासनस्तरावरूनही वेळोवेळी भरीव निधी मंजूर केला जात आहे. पर्यटन निधीतूनही राजवाड्यातील या स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न झाले. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली कोटींचा निधी खर्च होत आहे. सन २००५पासून त्यासाठी निधी खर्च होत आहे. त्यासाठी पूर्वी ६५ लाख दुरुस्तीवर खर्च झालेला होता.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरीtourismपर्यटन