शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

By संदीप बांद्रे | Published: December 05, 2023 4:59 PM

न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा

चिपळूण : अलोरे वरचीवाडी येथे पायवाटेसाठी ६५ मिटर लांबीची ग्रामपंचायतीला तिन ते चार फुटांची जागा विना मोबदला दिली होती. मात्र कुटुंबातील सहहिस्सेदारांच्या सह्या न घेताच त्यांच्या खोट्या सह्या मारण्यात आल्या. शिवाय तिन चार फुटाची जागा दिली असताना १० फूट रस्ता केला जात आहे. वाढीव रस्त्याला आमचा विरोध असून रस्त्यासाठी जागा देत नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला वाळीत टाकल्याची कैफीयत अलोरे वरचीवाडी येथील अनंत शंकर चव्हाण दांम्पत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माडंली.रस्त्याबाबत झालेल्या फसवणूकीबाबत माहिती देताना अनंत चव्हाण म्हणाले की, अलोरे वरचीवाडी येथे पाऊलवाटेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार तीन ते चार फुट रूंदीची ६५ मीटर लांब जागा विना मोबदला दिली होती. त्याकरिता आईने व मी कोऱ्या स्टॅंप पेपरवरती सह्या केल्या होत्या. मात्र याच जागेत सहहिस्सेदार असलेल्या बहिणींची संमत्ती घेतली नव्हती. कालांतराने ग्रामपंचायतीकडे असलेल्या रस्त्यांच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता बहिणींच्या खोट्या सह्या मारून संमत्तीपत्र केल्याचे दिसून आले. तत्कालीन सदस्या व विद्यमान सरपंच अंजली अरूण मोहिते यांच्या समक्ष सह्या केल्याचे दाखवले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही बहिणींच्या खऱ्या सह्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात तीन ते चार फुट पाऊलवाटेसाठी तोंडी संमत्ती असताना ७ ते १० फुटाचा पक्का रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी शासनाने डोंगरी विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे. सुरुवातीला दोघांच्या जागा घेण्याचे ठरले होते. मात्र आता लगतची जागा रस्त्यासाठी न घेता केवळ आपल्या जागेतून पाऊलवाटेचे वाढीव काम केले जात असल्याने जमिन शिल्लक राहत नाही. याबाबत गेली दोन वर्षे पंचायत समिती, तहसील स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. उपोषणाची नोटीस दिली, तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. वाढीव रस्त्यासाठी जागा देत नसल्याने दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. वाडीतील कोणत्याही कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. लोकांचे पुर्वीसारखे घरी येणे जाणेही राहिलेले नाही. वाडीतील ग्रामस्थांना हाताशी धरून दडपशाहीची भूमिका केली जात आहे. रस्त्यासाठी बेकायदा केलेले नियमबाह्य असलेले संमत्तीपत्र रद्द करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यात  कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यापुर्वीही पंचायत समितीने आश्वासने दिली होती. मात्र आता न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनंत चव्हाण यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकChiplunचिपळुण