शिवाजी गोरेदापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेले दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडी कार्यालयाकडून मंगळवारी (१४ मार्च) सकाळी अलिबाग येथून ताब्यात घेण्यात आले आहे. साई रिसाॅर्टप्रकरणी सदानंद कदम यांच्यानंतर आणखी एकाला अटक केल्याने खळबळ उडाली आहे.साई रिसॉर्टप्रकरणी यापूर्वीच उद्योजक सदानंद कदम यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम यांना जामीन मिळण्याआधीच ईडीने तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ताब्यात घेतल्याने माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जयराम देशपांडे यांच्या कारकिर्दीत दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील ६४ रिसॉर्टला बेकायदेशीर एनए परवानगी देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे साई रिसॉर्टसह अन्य हॉटेल व्यावसायिकांची परवानगी रद्द करण्यात आली होती. जयराम देशपांडे यांच्यावर महसूल खात्याने कारवाई करत दोन महिन्यापूर्वी निलंबित केले होते. त्यानंतर त्यांना अलिबाग येथे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले हाेते. तिथूनच ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घेतले.
साई रिसॉर्टप्रकरणी दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी ईडीच्या ताब्यात, अनिल परबांच्या अडचणीत वाढ होणार?
By अरुण आडिवरेकर | Published: March 14, 2023 12:36 PM