अडरे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकूल बांधकामांना गती देण्यासाठी चिपळूण तालुक्यातील तळसर येथे घरकूल मार्ट सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सभापती पांडुरंग माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समिती चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्य-किरण महिला ग्रामसंघ तळसर यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायत तळसर यांच्या सहकार्याने हे मार्ट सुरू करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील तळसर गावातील घरकूल वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाआवास अभियानामार्फत १०० टक्के घरकुलाचे कामकाज पूर्ण होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, तसेच ८ मार्च ते ५ जून या कालावधीत महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानही राबविण्यात येत आहे.
महाआवास अभियानातील उपक्रमांपैकी घरकूल मार्ट उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत गावातील घरकूल लाभार्थींना उत्तम दर्जाचे व योग्य दरातील बांधकाम साहित्य गावातच उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूर्य-किरण ग्रामसंघाने पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमाला
गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सरपंच सिद्धी पिटले, उपसरपंच अभिजीत मोहिते,
ग्रामपंचायत सदस्य विशाखा राजेशिर्के, विजय मुंडेकर, माधवी जाधव, राजेंद्र मोहिते, मनोहर घाग, वैष्णवी लाड, तसेच विस्तार अधिकारी बी.डी. कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर, प्रभाग समन्वयक सुमेधा बास्टे, प्रणव कोळेकर, सुहास माळी, तंटामुक्ती अध्यक्ष ऋषिकेश राजेशिर्के, वाडी प्रमुख तुकाराम जाधव, नीळकंठ राजेशिर्के, लक्ष्मण म्हादे, माजी सरपंच रवींद्र म्हादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेविका वासंती पाटील यांनी केले.