चिपळूण : लाईफकेअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफ कॅन्सर केअर सेंटरने पीईटी सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिली आहे. या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनमुळे शरिरात लपलेला कॅन्सर ओळखण्यास मदत हाेणार आहे.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये, रोगाच्या प्रारंभिक स्टेजसाठी पीईटी-सीटी स्कॅन आवश्यक आहे. जेणेकरून केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा शस्त्रक्रिया यासारख्या योग्य उपचारांची निवड चांगल्या परिणामासाठी होऊ शकेल. किमोथेरपी घेणाऱ्या रूग्णांमध्ये पीईटी-सीटी स्कॅनची पुनरावृत्ती केली जाऊ शकते. पीईटी सीटी मशीन उद्घाटनावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे चेअरमन उदय देशमुख, लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. इसहाक खतिब, डॉ. प्रभाकर घाणेकर, डॉ़. विक्रम घाणेकर, डॉ़. समीर दळवी, डॉ. विष्णू माधव, डॉ. सायली माधव, डॉ. प्रताप राजेमहाडिक, डॉ. गाैरव जसवाल, डॉ़. हसमुखकुमार जैन, डॉ़. अभिमन्यू वीर उपस्थित होते.