देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव गोठणे पुनर्वसन येथे बसविण्यात आलेल्या पथदीपचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे गावठाण परिसर प्रकाशमान झाला आहे.
गोठणे येथील ग्रामस्थांचे हातीव गावठाण येथे पुनर्वसन करण्यात आले असून, ३० हून अधिक कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. गावठाणमध्ये पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी होत होती. याची दखल हातीव ग्रामपंचायतीने घेऊन ग्रामपंचायत फंडातून २५ पथदीप बसविले आहेत. त्याचे उद्घाटन हातीव ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम, ग्रामपंचायत सदस्य अंबर गेलये, लक्ष्मी उंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय मेस्त्री, दत्ताराम गावडे, कोंडिबा पवार, श्रीपत उंडे, गंगाराम गावडे, मारुती गोंधळी, गणपत गोंधळी, प्रकाश उंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.