शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

फळबाग लागवडीमुळे मजुरांच्या संख्येत वाढ

By admin | Published: September 25, 2016 11:12 PM

रोजगार हमी योजना : जिल्ह्यात ५०० हेक्टरवर लागवड

शोभना कांबळे ल्ल रत्नागिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह््यात चालू आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू असून, यातून ४ हजार ७०५ इतक्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कालावधीत जिल्ह््यात सुमारे ५०० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड करण्यात आल्याने तसेच इंदिरा आवास योजनेच्या कामांना प्रारंभ झाल्याने मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात नांदेड, बुलढाणा, गडचिरोली, अमरावती, नंदुरबार, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अहमदनगर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये या कामांत घट झाली असून, नाशिक, रत्नागिरी, जळगाव, सातारा, धुळे या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह््यात आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू असून, त्यातून ४ हजार ७०५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. या एकूण कामांपैकी ११८ कामे ग्रामपंचायत स्तरावर तर २२८ कामे शासकीय यंत्रणा स्तरावरील आहेत. यासाठी प्रत्येकी १,५२२ आणि ३,१८३ अशी एकूण ४,७०५ इतकी मजूर उपस्थिती आहे. चालू आठवड्यात फळबाग लागवड तसेच इंदिरा आवास योजनेच्या कामांना सुरूवात झाल्याने मजुरांची संख्याही वाढली आहे. चालू आठवड्यात सुमारे ५०० हेक्टर जागेवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. जिल्ह््यात ग्रामपंचायत शेल्फवर ५३१४ तर शासकीय यंत्रणा स्तरावर २५२६ अशी एकूण ७ हजार ८४० इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर क्षमता ग्रामपंचायत स्तरावर २ लाख ५८ हजार ६९३ आणि शासकीय यंत्रणा स्तरावर २ लाख ८९ हजार ५०१ अशी एकूण ५ लाख ४८ हजार १९४ इतकी आहे. रोजगार हमी योजना मजुरीपुरती मर्यादित न ठेवता त्यामधून वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन कायमस्वरूपी टिकाऊ भत्ता निर्माण व्हावा, यासाठी महत्त्वाच्या ११ कामांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये सिंचन विहिरी, शेततळे, गांडूळ खत, नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, शौचालये, शोषखड्डे, गाव तलाव, पारंपरिक पाणीसाठ्याचे नुतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोपांची निर्मिती, वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण, ग्राम सबलीकरण (क्रीडांगणे, अंगणवाडी), ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी सुशोभिकरण, गावांतर्गत रस्ते, घरकुल, गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन शेड, मत्स्यव्यवसाय ओटे) यांचा समावेश आहे. ही कामे मोहीम स्वरूपात राबविण्यात येत असून, यासाठी ग्रामपंचायत, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वनविभाग, ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाचा सहभाग असणार आहे. दहा जिल्ह्यांत घट : वैयक्तिक लाभ राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू. ग्रामपंचायत शेल्फवर ५ हजार ३१४ कामे. वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू.