असगोली : ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत वेलदूर नवानगर येथील काेविड - १९ कुटुंब सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत आहे. या माेहिमेअंतर्गत १२८५ ग्रामस्थांची आराेग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य पथक, अंगणवाडी पर्यवेक्षिका पवार, ग्रामविकास अधिकारी आर. बी. कुळे, तलाठी डी. एन. आदलिंग, ग्राम सुरक्षा दलाचे रामचंद्र डांगे, नंदकुमार रोहिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर, आशासेविका सोनाली वनकर, महसूल कर्मचारी अजय गुडेकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षिका सत्वशिला जगदाळे, नवानगर उर्दूचे मुख्याध्यापक मुजीब, पल्लवी घुले, अंजली चप्पलवार, निलोफर शेख व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते. नवानगर वनकरवाडीतील ५५, रोहिलकरवाडीतील ११६, विठ्ठलवाडीत ६१, मोहल्ला ४९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.