शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

शिवशाही बसचे हप्ते थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:51 AM

विभाग नियंत्रकांची मध्यस्थी; दोन दिवसांत पैसे भरण्याचे आश्वासन

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात सर्वत्र शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. भाडेतत्त्वावर या बसेस महामंडळाने घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून या गाड्या घेतल्या आहेत, त्यापैकी दोन गाड्यांचे हप्ते थकल्याने कंपनीचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत बुधवारी दाखल झाले आहेत. विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थीमुळे कंपनीने दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही दिल्यामुळे तूर्तास तरी जप्तीची कारवाई टळली आहे.राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भाडेतत्त्वावर शिवशाही बसेस चालविण्यासाठी घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून शिवशाही बसेस घेतल्या आहेत, त्या कंपनीने कर्जावर गाड्या घेतल्या आहेत. कर्जाचे हप्ते संबंधित कंपनीकडून थकल्याने बुधवारी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्सचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी माळनाका येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी संबधित कंपनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून याची माहिती दिली. त्या वेळी दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही कंपनीने दिल्यावर फायनान्स कंपनीचे कर्मचारी कोल्हापूरला परत फिरले आहेत.गतवर्षीपासून अत्याधुनिक सोईसुविधा असलेल्या ‘शिवशाही’ गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या. रत्नागिरी विभागात एकूण ५३ शिवशाही बसेस आहेत. मात्र, ५३ गाड्या या सात खासगी कंपनीच्या मालकीच्या आहेत. अहमदाबाद, गुजरात येथील एका खासगी कंपनीने हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन शिवशाही बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र, याचे हप्ते थकल्याने बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे अधिकारी शिवशाहीच्या क्र. एमएच ४६ बीबी ३०५४ आणि क्र. एमएच ४६ बीबी ९०२३ दोन गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले. बस जप्त करण्याच्या नोटिशीसह एसटीच्या माळनाका येथील विभागीय कार्यालयात कंपनीचे प्रतिनिधी कोणतीही पूर्वसूचना न देताधडकले.एसटी महामंडळात दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून या गाड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वेळेवर गाड्या न सुटणे, धिमी गती, मार्गावर धावत असताना, मध्येच गाड्या बंद पडणे, चालक प्रशिक्षित नसणे या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत. काही वेळा तर शिवशाहीऐवजी साध्या गाड्या सोडण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढावली आहे. एसटी महामंडळातर्फे याचा दंड खासगी कंपनीकडून वसूल केला जातो....तर हप्ते कसे फेडणार?गाड्यांची पाहणी केली असता, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. टायरमधून तारा बाहेर आलेल्या आहेत. पुढील काचेला तडा गेला असून, ती कधीही फुटण्याचा धोका आहे. गाडीतही अस्वच्छता आहे. जी कंपनी गाडीची देखभाल करू शकत नाही, ती कर्जाचे हप्ते वेळेत कशी फेडणार, असा प्रश्न या वेळी हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांनी केला.त्या कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसात थकीत पैसे भरतो, अशी ग्वाही दिल्यावर जप्तीची कारवाई न करता फायनान्सचे कर्मचारी कोल्हापूरला परतले आहेत.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ