खेड : लाखो रुपये किमतीची इंटरनेट केबल व साहित्य चोरून नेल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात चिपळूणच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सागर अंकुश कदम (२७, रा. जामगे ता. खेड) याने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी रूपेश अनंत शिंदे (३८, चिपळूण) याने सुमारे ३ लाख ६४ हजार ३३० रुपये किमतीची इंटरनेट केबल वापरायचे साहित्य हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क डेटा कॉम प्रा. लि.च्या कार्यालयात नोकरीला असताना दिनांक १० मे २०१९ ते १९ मार्च २०२१ या कालावधीत चोरून नेले आहे.
या प्रकरणी सागर कदम याने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खेड पोलिसांनी रूपेश शिंदे यांच्याविरोधात भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर करत आहेत.