दापोली : आत्महत्या करणाऱ्या मुरुड पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमुळे मृत्यूचा गुंता अजून वाढला आहे. त्यांनी आपल्या पतीला लिहिलेल्या या पत्रात माहेरच्या व्यक्तींबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उलगडत नसल्याने आत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले आहे.पूर्वी तुरे यांनी २६ मार्च रोजी मुरुड येथील टपाल कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पर्समध्ये त्यांनी पतीला उद्देशून लिहिलेले एक पत्र सापडले आहे. आपल्या माहेरच्या मंडळींना अंत्यसंस्कारासाठी बोलावू नका, असे त्यात त्यांनी लिहिले आहे. त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर गेली पाच वर्षे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माहेरच्या मंडळींशी त्यांचा अबोला होता.ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता त्या मुरुड येथे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या. दुपारी त्या हर्णै येथे घरी आल्या होत्या. दुपारी पतीसोबत त्यांची भेटही झाली होती. त्यानंतर पती हर्णै येथील पोस्ट कार्यालयामध्ये ड्यूटीवर निघून गेले आणि पूर्वी आपल्या मुरुड येथील कार्यालयात निघून गेल्या होत्या.दोरी खरेदी करून नेलीपूर्वी तुरे यांनी हर्णै येथील एका दुकानात नायलॉनची दोरी खरेदी केली असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे त्यांनी आधीच निश्चित केले होते, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र त्यामागचे कारण अजूनही स्पष्ट होत नसल्याने पोलिसांसमोरील गुंता वाढतच चालला आहे.
पूर्वी तुरे यांच्या सुसाईड नोटमुळे गुंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 1:25 PM
Crime News Ratnagiri Police -आत्महत्या करणाऱ्या मुरुड पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमुळे मृत्यूचा गुंता अजून वाढला आहे. त्यांनी आपल्या पतीला लिहिलेल्या या पत्रात माहेरच्या व्यक्तींबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उलगडत नसल्याने आत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले आहे.
ठळक मुद्देपूर्वी तुरे यांच्या सुसाईड नोटमुळे गुंताआत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले