२. सध्या गावामध्ये सुरु केलेेल्या विलगीकरण केंद्रात लक्षणे नसलेले किंवा लक्षणे कमी असलेल्यांना ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविका लक्ष ठेवून आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. केंद्रातील दाखल बाधितांचे तापमान, ऑक्सिजनचा स्तर नियमित तपासला जात आहे. वाटद, कोतवडे, चांदोर आणि गणपतीपुळे येथील विलगीकरण केंद्रात ७३ कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागही लक्ष ठेवून आहे. आवश्यकता वाटल्यास अशा रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जाणार आहे.
३. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोगाव गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. दीड वर्ष उलटून गेले तरीदेखील गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. कशेडी घाटापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात सुमारे ३५० घरे असून, १२०० लोकवस्ती आहे. सरपंच, सदस्य, ग्रामकृती दल यांनी कोरोना काळात आपल्या गावकऱ्यांची घेतलेली काळजी, गावात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर स्प्रे करुन गावात प्रवेश करावा, अशी उपाययोजना करण्यात आली आहे.