शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

जीवितहानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : चंद्रकांत सूर्यवंशी

By शोभना कांबळे | Published: October 13, 2023 6:35 PM

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात ...

रत्नागिरी : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात धरुन येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जीवितहानी टाळू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आपत्ती म्हणजे काय, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, येणाऱ्या आपत्तीविषयी नेहमीच सजग रहायला हवे. विविध आपत्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यातून आपले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी. त्यावर येणारी माहिती खोटी असेल, तर ते विसरायला हवे. खरी असेल, तर त्यावर मात कसे करता येईल, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस जाहीर केला आहे. डब्लूएचओने मानवी प्रजातीला असणाऱ्या १० धोक्यांची यादी बनविली आहे. यात प्रथम क्रमांकावर पर्यावरण बदलाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापनात मन लावून काम करणे हे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही अनुभव कथन करुन ‘मॉक ड्रिल’ घेण्याबाबत सूचना केली. यावेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकार अजय सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी