रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.कोरोना संदर्भातील जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते.सामंत यांनी आढावा घेताना सांगितले की, जिल्ह्यात काल १३२ कोरोना रुग्ण सापडले. अॅक्टिव्ह रुग्ण ५९९ आहेत. होम आयसोलेशनमध्ये २९३ तर ३०० उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने जिल्हा महिला रुग्णालयात आणखी १२५ बेड वाढविण्यात आल्या आहेत. पालिकेच्या रुग्णालयात ५०, समाज कल्याणमध्ये १००तर बीएड कॉलेजमध्ये १००खाटा वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज असून जादा बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. तसेच पुरेसा ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.गेल्यावर्षी जशा खासगी शाळा ताब्यात घेतल्या होत्या. तशा यावेळीह घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात आजपासून नव्या लॉकडाउनचे निर्बंध लागु केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. आजपासून नाकेबंदी केली जाईल. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागु केली आहे. लॉकडाऊन काळात कृती समितीची भुमिका महत्वाची असून कृती समित्या जागृत करण्यात आल्या आहेत. गावात येणार्यांची कोरोना चाचणी झाली आहे की नाही, याची माहिती ते प्रशासनाला देणार आहेत. जिल्ह्यात सात दिवस कडक निर्बंध पाळा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतर निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने विचार होईल, असे सामंत म्हणाले.कारवाई करणारनियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने आज फक्त जागृती मोहीम राबवली. मात्र, इतर उघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली आहे.
लोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने पुन्हा लॉकडाऊन भोगण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 6:16 PM
शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
ठळक मुद्देलोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने पुन्हा लॉकडाऊन भोगण्याची वेळउघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार