शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

लंडनच्या विमानतळावर ‘जय भवानी जय शिवाजी’ उदय सामंत यांचे महाराष्ट्र मंडळाकडून स्वागत

By मनोज मुळ्ये | Published: October 03, 2023 3:35 PM

Uday Samant: वाघनखे आणण्यासाठी लंडनला गेलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे लंडनच्या विमानतळावर आगमन होताच तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

- मनोज मुळ्येरत्नागिरी : वाघनखे आणण्यासाठी लंडनला गेलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे लंडनच्या विमानतळावर आगमन होताच तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणाही त्यांनी दिल्या. राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हा दौरा आणि वाघनखे गेले काही दिवस चांगलीच गाजत आहेत.

ठाकरे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे मंत्री सामंत यांचा लंडन दौरा आधीपासूनच गाजत आहे. लंडनमध्ये असलेली वाघनखे खरी आहेत का, असा प्रश्न करुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार खळबळ उडवून दिली आहे. मंत्र्यांच्या परदेश दौर्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतल्याने ही लंडनवारी आधीपासूनच गाजत आहे. मंत्री उदय सामंत यांनी मात्र कोणीही ओरड केली तरी महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची घटना असल्याने हा दौरा होणारच असल्याचे ठामपणे जाहीर केले होते.

लंडनमध्ये असलेली वाघनखे परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत लंडन दौर्यावर गेले आहेत. मंत्री सामंत यांच्या स्वागतासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे सभासद हजर होते. त्यांनी अत्यंत उत्साहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मंत्री सामंत यांचे स्वागत केले. वाघनखे महाराष्ट्रात नेण्याबाबतच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र मंडळाचे अनेक लोक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाबाबत सर्वांमध्ये खूपच उत्साह आणि उत्सुकता आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtraमहाराष्ट्रShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRatnagiriरत्नागिरी