चिपळूण : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरीने आयोजित केलेल्या अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा विजय क्रीडा संकुल, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाल्या. क्रीडा स्पर्धेसाठी कर्णबधीर, मतिमंद, अंध, अस्थिव्यंग, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, पंचायत समितीअंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत धावणे, गोळाफेक, लांबउडी, सॉफ्ट बॉल थ्रो, भरभर चालणे, पासिंग बॉल, स्पॉट जंप आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन समाजकल्याण सभापती शीतल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोलीच्या सभापती गीतांजली वेदपाठक, जिल्हा परिषद सदस्य सुजाता तांबे, अजय बिरवटकर, स्मिता जावकर, प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी दापोली मनीषा देवगुणे, गटशिक्षणाधिकारी जे. जे. खोत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के, सहाय्यक लेखाधिकारी समाजकल्याण विभाग विजय मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी हरिष जगताप, विस्तार अधिकारी मोहन पोवार, संजय जाधव, शुभांगी गांधी, प्रभा करमरकर, अशोक परांजपे, निलांबरी अधिकारी, माधुरी मादुस्कर, सर्व अपंग शाळेतील स्पर्धक, शिक्षक, कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ शाळांमधील २२० विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेतील २४ विद्यार्थी व ५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रोशन परब, गोळाफेक प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे तृतीय, तेजस सकपाळ २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे द्वितीय, सूरज सुतार पळत येऊन लांबउडीत प्रथम, गोळाफेक प्रथम, प्रियांका भुरण १०० मीटर धावणेत प्रथम, गोळाफेक प्रथम, भूषण कांगणे २०० मीटर धावणे प्रथम, गोळाफेक द्वितीय, अंकिता लाड, स्पॉटजंप द्वितीय, १०० मीटर धावणेत तृतीय, प्रणाली नरळकर, गोळाफेक द्वितीय, सर्वेश खेराडे २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, अश्विनी कदम, गोळाफेक द्वितीय, अमोल मोरे गोळाफेक तृतीय, आदीब मुकादम २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय आला.स्पर्धेच्या सरावासाठी मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक सुनील शिंदे, क्रीडाशिक्षिका आशा धुरी, उपमुख्याध्यापक उमेश कुचेकर, प्रकाश घाडगे, राजेश सावंत, प्रकाश बलाढ्ये यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी यश मिळवून सिंहाचा वाटा उचलला. मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर, संस्थेच्या सचिव सुमती जांभेकर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
‘जिद्द’च्या मुलांनी जिद्दीने मिळवले यश
By admin | Published: December 24, 2014 11:19 PM