चिपळूण : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांचा राष्ट्रभाषा हिंदी कार्यक्रमासाठी १३ पासून राज्यव्यापी दौरा सुरु होत आहे. राष्ट्रभाषेचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने हा दौरा कार्यक्रम होत आहे. दि. १३ रोजी पुणे येथे कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल. दि. १४ रोजी राष्ट्रभाषा हिंदी दिन कार्यक्रम, नाशिक शहर, नाशिक रोड देवकॉलनी कॅम्प येथे सकाळी ९.३० वाजता होईल. दि. १६ रोजी रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक विद्यालय येथे, त्यानंतर लांजा, संगमेश्वर तालुक्यातील हिंदी शिक्षकांसाठी उद्बोधन व मार्गदर्शन होईल. सायंकाळी ७.३० वाजता क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय, रत्नागिरी येथे बँक आॅफ महाराष्ट्र येथे ग्राहक मेळावा होईल. १७ रोजी खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण या तालुक्यातील हिंदी शिक्षकांसाठी उद्बोधन होईल. दि. ३० रोजी खेड येथे राष्ट्रभाषा हिंदी पंधरवड्याची सांगता होणार आहे. हिंदी पंधरवड्यानिमित्तआयोजित केलेल्या या दौऱ्याचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
जोशी यांचा आजपासून राष्ट्रभाषा प्रचार दौरा
By admin | Published: September 12, 2014 11:34 PM