शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

नोटांअभावी जेमतेम एटीएम सुरू

By admin | Published: November 11, 2016 11:01 PM

प्रदीप पी. : बँकांच्या विभागीय कार्यालयाकडून रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू, प्रशासनाकडून सातत्याने आढावा

रत्नागिरी : पाचशे आणि हजार रुपयांच्या सध्याच्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आल्यानंतर साहजिकच बँकांमधील ग्राहकांची गर्दी वाढली आहे. बँकांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ कामकाज सुरू ठेवून पैसे स्वीकारणे, बदलणे तसेच काढून देणे, या गोष्टी सुरू ठेवाव्यात, अशा सूचना आपण दिल्या आहेत. सद्यस्थितीत १00 रुपयांच्या नोटांची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यात मोजकीच एटीएम सेंटर सुरू आहेत. नोटांची उपलब्धता झाल्यानंतर उर्वरित एटीएमही सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ‘लोकमत’ला दिली. पाचशे आणि हजार रुपयांच्या सध्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर झाला. तेव्हापासून लोकांमधील चलबिचल वाढली. बुधवारी सकाळच्या सत्रात ग्राहकांशी होणाऱ्या वादामुळे एक पेट्रोल पंप बंद झाला. त्यावेळी लगेचच जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जिल्ह्यातील सर्व खात्यांचे महत्त्वाचे अधिकारी तसेच पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोणकोणत्या खात्यांनी या नोटा स्वीकारल्या पाहिजेत, हे सांगतानाच लोकांची गैरसोय न करण्याच्या स्पष्ट सूचनाही दिल्या. बुधवारी बंद असलेल्या बँका गुरूवारी सुरू झाल्या. खातेदारांनी सध्याच्या नोटा बदलण्यासाठी, त्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी रांगाच रांगा लावल्या. लोकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांचे काऊंटर तीन वाजता बंद न करता उशिरापर्यंत सुरू ठेवावेत, अशा सूचना आपण दिल्या होत्या. त्यानुसार बँका साडेपाच वाजेपर्यंत लोकांकडून पैसे स्वीकारत आहेत आणि बदलूनही देत आहेत. पाचशे तसेच दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. बँकांमधून पैसे काढणाऱ्यांना त्या दिल्या जात आहेत. मात्र, त्याचे प्रमाण मर्यादीत असल्याने १00च्या नोटाही दिल्या जात आहेत. रत्नागिरीमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्र या तीन बँकांकडे करन्सीचेस्ट (रिझर्व्ह बँकेच्यावतीने नोटा साठवून ठेवण्यासाठी मिळालेली प्राधिकृतता) आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आपल्या शाखांसाठी गरजेची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे मागितली आहे. जसजशी या रकमेची उपलब्धता होत जाईल, तसतसा या रकमेच्या वितरणाचा वेग वाढेल आणि ही समस्या संपेल, असा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी) एटीएमला मिळणार १00 रूपयांच्याच नोटा पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध होत असल्या तरी एटीएम सेंटरमध्ये सध्या १00 रूपयांच्याच नोटा उपलब्ध होणार आहेत. नव्या नोटांचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार एटीएममधील पैसे ठेवण्याच्या ट्रेमध्ये बदल करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत दोन हजार रूपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. आता त्यासाठी बँकांना आपल्या एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे. तो बदल होईपर्यंत १00 रूपयांच्या नोटा एटीएममधून मिळतील्