शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:04 PM

CoronaVirus Ratnagiri-स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देकुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालनग्रामपंचायतीचा सक्रिय पुढाकार, ग्रामस्थांचे सहकार्य

अनिल कासारेलांजा : स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.लांजा शहरापासून १३ किलोमीटरवर काजरघाटी - पावस मार्गावर वसलेले कुर्णे गाव आहे. या कुर्णे गावात तीन महसुली गावे आहेत. कुर्णे महसूल गावाची लोकसंख्या ६८४, घडशी ४१७ तर पड्यार गावची लोकसंख्या ४५८ आहे. संपूर्ण कुर्णे गावची एकूण लोकसंख्या १ हजार ५५९ एवढी आहे.

गावामध्ये वरची मानेवाडी - गुरववाडी, खालची मानेवाडी - गुरववाडी, बौध्दवाडी, खाकेवाडी, कदमवाडी, ब्राह्मणवाडी, घडशीवाडी, सुतारवाडी, पड्येवाडी, दाभोलकरवाडी अशा एकूण १० वाड्या आहेत. ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून सार्वजनिक, धार्मिक, सामाजिक, विकासकामांच्या मुद्द्यावर सर्व ग्रामस्थ सलोख्याने कामे करतात. नुकताच कुर्णे ग्रामपंचायतीला माजी गृहमंत्री कै. आर. आर. तथा आबा पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कारही मिळाला आहे.कुर्णे गावचे बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे - मुंबई येथे कामाला आहेत. हे चाकरमानी गणपती उत्सव, गावची यात्रा व होळी सणाला आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावतात. सन २०२० मध्ये मार्च महिन्यात शिमगोत्सव असल्याने गावातील बरेचसे चाकरमानी गावात दाखल झाले होते. शिमगोत्सव संपतो न संपतो तोच देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे चाकरमानी गावातच अडकून पडले.

मुंबई - पुणे येथील कंपन्या बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांनी गावची वाट धरली. कोरोना कालावधीत निर्बंधांचे कडक पालन करून त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. याचे उत्तम नियोजन कुर्णे ग्रामपंचायतीने केले होते.महानगरातून आलेल्या चाकरमान्यांची जबाबदारी प्रत्येक वाडीवर व त्यांच्या कुटुंबीयांवर सोपविण्यात आली होती. वाडीतील बंद घरांमध्ये चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले जेवणाचे साहित्य व पाणी त्यांच्या कुटुंबीयांनी दिले आणि १४ दिवस त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे त्यांचा संपर्क येथील स्थानिक रहिवाशांशी आलाच नाही.

होम क्वारटाइन चाकरमान्यांची व्यवस्था तसेच ते स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी ग्रामपंचायत घेत होती. चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्यसेविका सई भुर्के, सुप्रिया बोंबले, आशासेविका आकांक्षा कासारे, पड्यारच्या अंगणवाडीसेविका अक्षदा कांबळे, कुर्णेच्या अंगणवाडीसेविका योगिता घडशी, घडशी गावच्या अंगणवाडीसेविका अश्विनी घडशी यांनी क्वारंटाइन चाकरमान्यांची आरोग्याच्या दृष्टीने दरदिवशी विचारपूस केली.

कुर्णेच्या सरपंच संजना पड्ये, उपसरपंच मोहन घडशी, सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील राजेश मोरे हे ग्राम कृतीदलाच्या माध्यमातून चाकरमान्यांकडून शिस्त पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवून होते. इतरत्र कोरोनोचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सुनियोजनामुळेच कुर्णे ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.ग्रामपंचायतीचे नियोजनलॉकडाऊन काळात ग्रामस्थांना भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी ना तोटा ना फायदा या तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस ग्रामस्थांना भाजीपाला घरपोच पुरविला. कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतीने तीन रिक्षा ठरवून दिल्या. त्या रिक्षाचालकांनी ग्रामस्थांना डॉक्टरकडे सोडायचे आणि त्यानेच पुन्हा घरी आणून सोडायचे ही जबाबदारी देण्यात आली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी