शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Ratnagiri: जुवे-जैतापूर ग्रामपंचायत तब्बल १२ वेळा बिनविरोध, शिवसेना ठाकरे गटाचा ग्रामपंचायतीवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:37 PM

बिनविरोधची परंपरा कायम

राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासात एकदाही मतदान प्रक्रिया पार पडली नाही. यावेळीही बिनविरोधची परंपरा कायम राखली असली तरी अद्यापही या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भयान वास्तव आहे.जुवे जैतापूर गाव हे जैतापूरला जवळ असून चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. यामुळे भौगलिक क्षेत्रही मर्यादीत आहे. ग्रामपंचायतीच्या  मतदार यादीमध्ये ८२ मतदारांनी आपली नावे नोंदविली आहेत. रत्नागिरी जिल्हातील सर्वाधिक कमी मतदार असलेली ही ग्रामपंचायत आहे. ७  सदस्य संख्या व लोकनियुक्त सरपंच अशी ८ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यंदाही जुवे जैतापूर ग्रामपंचायतीने आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली असुन आता या ग्रामपंचायतीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने आपला दावा केला आहे. शिवसेनेचे वर्चस्व गेली ५४ वर्ष या ग्रामपंचायतीवर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे.  मात्र अद्यापही  या गावाच्या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक समस्येमुळे ही ग्रामपंचायत समस्यांचे आगर बनली आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवस