रत्नागिरी : येथील प्रसिद्ध कबड्डीपटू सूरज पाटील (३६, रा. मिरजाेळे, पाटीलवाडी) यांचे शुक्रवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या दरम्यान काेल्हापूर येथील रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त रत्नागिरीत येऊन धडकताच अनेकांना धक्का बसला.
रत्नागिरीमधील कबड्डी क्षेत्रातील गुणी खेळाडू, राष्ट्रीय पंच व उपाध्यक्ष म्हणून सूरज पाटील यांची ओळख हाेती. त्याचबराेबर मिरजाेळे ग्रामपंचायतीचे सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख म्हणूनही ते कार्यरत हाेते. दाेन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली हाेती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला हाेता. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी काेल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध हाेते. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त रत्नागिरीत येऊन धडकताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीच्या क्रीडा जगतावर शाेककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.