शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 4:43 PM

रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धावआपत्तीग्रस्तांसाठी धान्य अन् विविध वस्तूरुपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून रवाना

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकामधून केरळकडे रवाना करण्यात आले.केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराने थैमान घातले होते. या महापुरात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सुमारे ४०० लोकांचे बळी या महापुराने घेतले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच आर्मीच्या सहाय्याने हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेच. पण, या पुरात येथील नागरिकांचे सर्व काही वाहून गेले. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडा-लत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या राज्यावर आलेल्या आपत्तीत य नागरिकांना सहकार्य करण्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील इतरही राष्ट्र धावून आली आहेत. केरळमधील अनेक लोक रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांनी तत्काळ या लोकांसाठी मदत उभारली.

त्याला येथील व्यापारी संघटनेनेही आर्थिक हात दिला. त्यामुळे एक - दोन दिवसांतच तांदूळ, डाळी आदी धान्ये तसेच गरजेच्या इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. या वस्तूंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला.सेवाभावी संस्थांकडून मदतभीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या ६०३१२९७८१४९ या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लोकमतचाही खारीचा वाटाकेरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलाही हातभार या संघटनांसोबत लागावा, या उद्देशाने लोकमतच्या रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद आदी पदार्थांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी