रत्नागिरी : ५९ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली आहे. खल्वायनने सादर केलेल्या संगीत ताजमहाल नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तसेच आश्रय सेवा संस्थेने रत्नागिरी या संस्थेच्या संगीत जय जय गोरी शंकर या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.स्पर्धेत अमृत नाट्यभारती, मुंबई संस्थेने सादर केलेल्या ह्यसंगीत स्वयंवर या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मनोहर जोशी (संगीत ताजमहाल) द्वितीय पारितोषिक नितीन जोशी (संगीत जय जय गोरी शंकर) नेपथ्याचे प्रथम पारितोषिक सुरेंद्र वानखेडे (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष),
द्वितीय पारितोषिक सिध्देश नेवसे (आपुलाचि वाद आपणासि), नाटयलेखनाचे प्रथम पारितोषिक डॉ.विद्याधर ओक (संगीत ताजमहाल) द्वितीय पारितोषिक महादेव हरमलकर (म्हणे सोहिरा), संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक डॉ.विद्याधर ओक (नाटक-संगीत ताजमहाल), द्वितीय पारितोषिक मयुरेश कस्त (नाटक-म्हणे सोहिरा)संगीतसाथ आॅर्गनमध्ये प्रथम क्रमांक वरद सोहनी (संगीत कट्यार काळजात घुसली) द्वितीय क्रमांक मधुसुदन लेले (संगीत ताजमहाल), तबला प्रथम क्रमांक हेरंब जोगळेकर (संगीत ताजमहाल), द्वितीय क्रमांक प्रथमेश शहाणे (नाटक-संगीत जय जय गोरी शंकर), संगीत गायन रौप्यपदक दत्तगुरू केळकर (तुका आकाशा एवढा), अजिंक्य पोंक्षे (संगीत ताजमहाल), संपदा माने (संगीत स्वयंवर), गायत्री कुलकर्णी (संगीत मानापमान) यांना तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक गुरूप्रसाद आचार्य (संगीत कट्यार काळजात घुसली), वामन जोग (संगीत ताजमहाल) सिध्दी बोंद्रे (संगीत मानापमान), निवेदिता चंद्र्रोजी (संगीत भावतोचि देव) यांना जाहीर झाले आहे.गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रांसाठी शारदा शेटकर (म्हणे सोहिरा), स्मिता करंदीकर (संगीत ताजमहाल), संचिता जोशी (सं. जय जय गौरीशंकर), गोरी जोशी (संगीत कट्यार काळजात घुसली), जान्हवी खडपकर (सं. संशय कल्लोळ), वरद केळकर (संगीत ताजमहाल), स्वानंद भुसारी (कट्यार काळजात घुसली), विशारद गुरव (कट्यार काळजात घुसली), ओंकार प्रभुघारे (संगीत स्वयंवर), दशरथ नाईक (म्हणे सोहिरा) यांना जाहीर झाली आहेत.
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी प्राची सहस्त्रबुध्दे (संगीत स्वयंवर), सांची तेलंग (संगीत भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष), मिताली मातोंडकर (तुका आकाशा एवढा), सुचित्रा गिरधर (आपुलाचि वाद आपणासि), श्रृतिका कदम (संगीत जय जय गौरीशंकर), अभय मुळ्ये (सं. जय जय गोरीशंकर), गिरिश जोशी (सं. जय जय गौरीशंकर), विजय जोशी (संगीत ताजमहाल), सुनील जोशी (संगीत स्वयंवर), श्रेयस अतकर (संगीत भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष) यांची निवड करण्यात आली आहे.इचलकरंजी येथे झालेल्या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदीप ओक आणि सुधीर ठाकूर यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.