राबगाव/पाली : सुधागड तालुक्यात जांभूळपाड्यातील दहिगाव आदिवासीवाडीतील रामा जाधव यांनी त्यांच्या चार वर्षीय मुलीची जंगलात हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. हत्या केल्यावर त्याने मुलीचा मृतदेह जंगलातून खांद्यावर आणल्याने गावात खळबळ उडाली. रामाने कौटुंबिक वाद आणि दारूच्या नशेत आपली चार वर्षीय मुलगी शालू हिला जंगलात नेऊन कोयत्याने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मुलीचे पार्थिव खांद्यावरून गावात आणून ते वाडीतील लक्ष्मी वाघमारे हिच्या घरी ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. रामाला पोलिसांनी अटक केली आहे.
कौटुंबिक वादातून मुलीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:15 AM