शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Kirit Somaiya in Dapoli: सोमय्या येताच दापोलीत जमावबंदी लागू, पोलीस स्थानकातच निलेश राणेंचा राडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 6:47 PM

साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये मनाई आदेश जारी केला.

दापोली : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी (२६ मार्च) दापोलीत आले आहेत. किरीट साेमय्या जिल्ह्यात दाखल होताच पाेलिसांनी १४४ कलम लागू करत मनाई आदेश जाहीर केला आहे. या आदेशानंतर दापाेली पाेलीस स्थानकात काेणाला साेडायचे यावरुन जाेरदार राडा झाला. निलेश राणे यांनी आक्रमक हाेत पाेलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे मुरुड येथील रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी केंद्रापर्यंत तक्रार अर्ज दाखल करुन बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही हे बांधकाम पाडण्यात आलेले नाही. बांधकाम पाडण्याबाबतची कार्यवाही काेठेपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी किरीट साेमय्या २६ मार्च राेजी दापाेलीत आले आहेत.साेमय्या यांच्या या दाैऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विराेध केला आहे. तर स्थानिक हाॅटेल व्यावसायिकांनीही विराेधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दापाेलीत कडेकाेट पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. किरीट साेमय्या यांच्या दाैऱ्यात माजी खासदार निलेश राणेही सहभागी झाले असून, त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिआव्हान दिले आहे.साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये मनाई आदेश जारी केला. मनाई आदेश जारी झाल्यानंतर किरीट साेमय्या, निलेश राणे बैठकीसाठी दापाेली पाेलीस स्थानकात दाखल झाले हाेते.यावेळी मनाई आदेशाची प्रत त्यांच्या हाती देत सर्वांना पाेलीस स्थानकात येण्यास मज्जाव केला. पाेलीस स्थानकात काेणाला साेडायचे यावरुन स्थानकाबाहेरच राडा झाला. त्यावरुन निलेश राणे आक्रमक झाले. त्यांनी ‘माझ्या अंगाला हात का लावलात,’ असा प्रश्न पाेलिसांना विचारला. त्यानंतर पाेलीस स्थानकाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीKirit Somaiyaकिरीट सोमय्याNilesh Raneनिलेश राणे Policeपोलिस