किरवलेंच्या हत्येचा रत्नागिरीत निषेधजिल्हाधिकारी यांना निवेदन रत्नागिरी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापूर येथे हत्या करण्यात आली. या कृत्याचा निषेध करणारे निवेदन युएसए व समतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील विचारवंत व लेखकांच्या हत्या होत आहेत. दलित महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा व सुव्यवस्था ढासळू लागली आहे. डॉ. किरवले यांच्यासारख्या आंबेडकरवादी विचारवंताची हत्या हे याचे उदाहरण आहे. या कृत्याबद्दल या निवेदनात तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी सर्व अंगांनी तपास व्हावा व मारेकऱ्यांना फाशी द्यावी. योग्य ती कार्यवाही न झाल्याय युएसए व समतावादी सांस्कृतिक चळवळीतर्फे तीव्र आंदोलने केली जातील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे देण्यात आले. निवेदन देताना युएसएचे राजाध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, कोकण संघटक प्रफुल्ल जाधव, सिद्धार्थ सावंत, तुषार मांडवकर, सोनाली कांबळे, तुषार जाधव, आनंद सनगर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
किरवलेंच्या हत्येचा रत्नागिरीत निषेध
By admin | Published: March 13, 2017 2:02 PM