असगोली : आंबा बागायतदारांच्या मदतीला असणाऱ्या किसान रथमार्फत गुहागर आगारात सेवा देण्यात यावी, अशी मागणी गुहागर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी एस्. टी. आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आंबा बागायतदारांच्या मदतीकरिता परजिल्ह्यात आंबा वाहतूक करण्यासाठी एस. टी. महामंडळाने शेतकरी ते ग्राहक संकल्पना राबवत किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी, एस. टी.च्या माध्यमातून बागायतदारांना आता आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रयत्न करावेत. मात्र या योजनेचा गुहागरच्या शेतकरी, बागायतदार यांना फायदा होत नसल्याचे म्हटले आहे.
आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेलपासून ते बोरीवलीपर्यंत आंबा पेट्या पोहोचवल्या जात आहेत. मात्र, गुहागरमध्ये या सेवेचा फायदा मिळत नाही. गुहागर आगारातूनही ही सेवा सुरू करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.