शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

देवाचा डोंगर समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: May 11, 2016 11:13 PM

खेड तालुका : पदरमोड करून केलेला रस्ता वाहून गेला; पाण्यासाठी आजही पायपीट

खेड : खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच समस्या पूजलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामस्थांनी पदरमोड करून तयार केलेला रस्ताही पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाला सुगीचे दिवस कधी येणार? असा सवाल होत आहे.तुळशीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. रस्तादेखील कच्चा आणि दगडधोंड्यातून जाणारा आहे. रामदास कदम यांच्या कारकिर्दीत हा रस्ता तयार झाला आहे़ मात्र, त्यानंतर या कच्च्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणीही पाहिले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन हा रस्ताच आता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहने न्यायची कशी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर गाव हे वीस किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे. या धनगरवाडीत दहा घरे आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांना अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही़ या वाडीत लहानसा पाण्याचा पऱ्या आहे़ त्यातील पाणी हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरते़ मात्र, त्यानंतर या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वाडी डोंगरावर वसलेली असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना खाली तुळशी गावात यावे लागते़ अन्यथा खासगी वाहनातून जामगे येथून पाणी आणावे लागते.़ तसेच ज्या ग्रामस्थांकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावापर्यंत चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर ग्रामस्थांना पार करावे लागते. पाण्यासाठी तीन-तीन खेपाही माराव्या लागत आहेत़ रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवस पुरेल एवढे पाणी एकावेळेला भरावे लागत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धनगरवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रतिवर्षी जाणवत आहे़ पाऊस सुरू होईपर्यंत या धनगरवाड्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ ग्रामस्थांना जनावरांनाही पाणी द्यावे लागते. टंचाईच्या काळात पाणी पुरविणे अवघड होत असले तरीही कसलीही तमा न बाळगता ग्रामस्थांना हे करावे लागत आहे़ ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. मात्र, टँकर वाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे़ टँकर वाडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (प्रतिनिधी)जामगेचा आधार : धनगरवाड्यात पाणीच नसल्याने चार किलोमीटरवरून वाहतूकतुळशी देवाचा डोंगर गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून चार किलोमीटर अंतरावरील जामगे गावातध्ये जावे लागत आहे़ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने ही पायपीट सुरू झाली आहे़ जामगे गावातील हे पाणी इथल्या लोकांना मोठा आधार ठरले आहे.