रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनसाठी कोकणातील तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील, भारताच्या विविध राज्यातील धावपटू रत्नागिरीत येत आहेत. २०२४ पासून दरवर्षी पहिला रविवार रत्नागिरीला धावनगरी बनवण्याचा संकल्प सर्व रत्नागिरीकरानी केला आहे. यामध्ये कुठेही कमतरता असू नये यासाठी सर्व ग्रामपंचायतीही आपले योगदान देत आहेत.ही मॅरेथॉन आपली मॅरेथॉन आहे या भावनेने रत्नागिरी शहरवासियांसह नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप आणि भाट्ये या गावातील ग्रामस्थ तयारीला लागले आहेत. सर्व धावपटूंचे आपल्या गावात स्वागत कसे करता येईल, आपला सुंदर गाव यानिमित्ताने सर्वदूर कसा पोचवता येईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ या सर्व धावदूतांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
कोकण कोस्टल मॅरेथॉन: धावपटूंच्या स्वागतासाठी रत्नागिरीसह नऊ गावातील ग्रामस्थ उत्सुक
By मेहरून नाकाडे | Published: December 26, 2023 6:31 PM