शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कोकण मर्कं टाईल : १७ जणांना अटक

By admin | Published: November 21, 2014 11:46 PM

संख्या ३०वर : सराफ व निवृत्त शाखाधिकाऱ्यांचा समावेश

देवरुख : कोकण मर्कं टाईल को-आॅप. बँकेच्या संगमेश्वर शाखेतील बनावट दागिन्यांप्रकरणी पोलिसांनी आज, शुक्रवारी एक सराफ, दोन निवृत्त शाखाधिकाऱ्यांसह १७ जणांना अटक केली. या प्रकरणात बँकेची दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, यात ३९ जण सहभागी आहेत.या १७ जणांना आज उशिरा सायंकाळी देवरुख न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. २७ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आजपर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ३० वर पोहोचली आहे. या घटनेबाबतची फिर्याद मुंबई शाखेचे सहायक व्यवस्थापक अकबर युसूफ कोंडकरी (वय ४७, रा. मुंबई) यांनी ४ आॅक्टोबर २०१४ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. हा बनावट सोनेतारण फसवणुकीचा प्रकार १८ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत घडला आहे.या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलीच गती मिळाली असून, बरेच दिवस पोलिसांच्या हाती न लागलेल्या बँकेच्या सराफाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले करीत आहेत. या प्रकरणी आज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी संगमेश्वर येथे भेट देऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)अटक केलेल्यांची नावे अशीसराफ उदय सैतवडेकर (संगमेश्वर), निवृत्त शाखाधिकारी तौफिक इब्राहिम सादिम (रत्नागिरी), नासीर खान उमरखान मापारी (मुचरी - संगमेश्वर) याबरोबरच विनोद कुळ्ये, नौशाद अब्बास खान (चिपळूण), शौकत याकूब अलवारे (चिपळूण), मेहताज महमम इसाकतांबे (चिपळूण), अनिसा अलिमिया काझी (गोवळकोट-चिपळूण), हतीजा दाऊद बेबल (गोवळकोट), मरियांबी इस्माईल हिलवान (कोंडवरी), सुलेमान इब्राहिम खान (चिपळूण), यासीन युसूफ नाईक (फुणगूस), सतीश गमरे (चिपळूण), इकबाल महमद मुल्ला (कळंबस्ते), जाहीर जमारुद्दीन कोळथरकर (चिपळूण), नसीना इक्बाईल मुल्ला व साजिया इक्बाल मुल्ला (रा. कळंबस्ते, संगमेश्वर) यांचा समावेश आहे.