शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

कोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:44 PM

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

ठळक मुद्देकोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

आरक्षणाच्या डब्यात अजूनही जनरल तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण आणखीनच वाढले असून, गाडीतील वीज आणि पंखे बंद असण्याची समस्या डोकेदुखी ठरत आहे. गाडीतील शौचालयातही विजेच्या समस्येबरोबरच पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. बहुतांशी सगळ्याच समस्यांनी भरून वाहणाऱ्या या गाड्या म्हणजे केवळ रूपडे बदलले पण समस्या तशाच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोकणासाठी भूषणावह असणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास कोकणातील माणसांसाठी दिवसेंदिवस अधिकच महाग होत चालला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या या गाड्यांचा कोकणी जनतेला फायदा कमीच होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीला कायमच वर्दळ असते. कोकणची कन्या म्हणून ओळख असणाऱ्या या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या सुरूवातीपासून प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन्ही गाड्यांचे रूपडे आता बदलण्यात आले आहे.

आधी या गाड्यांना आयसीएफ कोच होते. आता नव्या स्वरुपात या दोन्ही गाड्यांना अधिक लांबीचे व अधिक प्रवासी क्षमता असलेले एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. या एलएचबी कोचमध्ये एलईडी दिवे, हायड्रॉलिक शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, डिस्क बे्रक प्रणाली, उत्तम सस्पेंशन या सुविधा देण्यात आल्या आहेत.या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले असले तरी या गाड्यांमधील समस्या तशाच आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या गाड्यांपेक्षा जुनं तेच सोनं असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतून प्रवास करताना जनरल डब्याचे तिकीट घेणारे प्रवासी थेट आरक्षित डब्यांतूनच प्रवास करतात. या प्रवाशांमुळे जादा पैसे मोजून सुखाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नीटसा प्रवासही करता येत नाही. या डब्यातील तिकीट तपासनीसदेखील काही करू शकत नाहीत, हे विशेष.गाडीतील पंख्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, बहुतांशी पंखे बंदावस्थेतच असतात. जे सुरू असतात, त्या पंख्यांची हवाच प्रवाशांना लागत नाही. शौचालयातील दिवे तर पूर्णत: बंदावस्थेत असतात तसेच शौचालयात पाणीच नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की, कोकण रेल्वेच्या देखाव्यासाठी आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गाडीतील या समस्यांमुळे जुन्याच गाड्या बऱ्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतील प्रवाशांमधून या समस्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.गाडीचे डबे वाढविण्याऐवजी केले कमीगाडीची प्रवासी क्षमता वाढवताना या गाड्यांच्या बोगींची संख्या पूर्वीच्या २४ वरून आता २२ करण्यात आली आहे. जनरल डब्यांची संख्या कमी केल्याने हे प्रवासी थेट आरक्षित डब्यात शिरतात. त्यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात. गाडीला चांगले भारमान असूनही डब्यांची संख्या का वाढवली जात नाही, असा सवाल केला जात आहे.रेल्वे प्रशासन गंभीरच नाहीगतिमान प्रशासनाचे स्वप्न पाहणाऱ्या शासनाने प्रवाशांनी केलेल्या ट्विटनंतर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. यापूर्वी कोकण रेल्वेकडून तशी दखलही घेतली जात होती. मात्र, आता प्रवाशांनी मांडलेल्या समस्येची दखलच घेतली जात नसल्याचे दिसत आहे. प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासन गंभीरच नसल्याचे स्पष्ट होत आहे.मोबाईल पॉइंट बंदावस्थेतगाडीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. आरक्षित डब्यात मोबाईल चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. पण, त्यासाठी ठेवण्यात आलेले स्वीच बंदावस्थेतच आहेत. त्यामुळे चार्जिंग करायचे कसे? याबाबत तिकीट तपासनीसांना विचारले असता, गाडी नवीनच आहे, असे कसे होऊ शकते असे आश्चर्यकारक उत्तर देतात.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी