रत्नागिरी - खेड रेल्वे स्थानकाजवळील सुकीवली गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर भला मोठा दगड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प झाली. स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण आणि रत्नागिरी येथून मदत मिळाल्यानंतर ट्रॅकवरचे दगड फोडून बाजूला करण्यात आले व कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच रेल्वेला ब्रेक लागला.
खेड रेल्वे स्थानकादरम्यान सुकीवली गावानजीक मोठे दरड शनिवारी रात्री 9:30 वाजता रेल्वे ट्रॅकवर आले होते. ही गोष्ट गस्ती घालणाऱ्या ट्रॅकमॅनच्या लक्षात आली व त्याने प्रसंगावधान दाखवले व याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्या दरम्यान मुंबईहून रत्नागिरीकडे येणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर पडलेल्या दगडांपासून काही अंतरावर थांबवण्यात आली..तीन तास या ठिकाणी पॅसेंजर थांबण्यात आली. ट्रॅकवरचा दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे मात्र यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.यावेळी सुकीवली येथील स्थानिक ग्रामस्थ दादू कदम, रुपेश कदम, रुषिकेश कदम, राकेश शिंदे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, सुरज भोसले रुपेश सावंत निलेश शिंदे यांनी दगड दूर करण्यास मदत केली.