रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७.६२ टक्केने निकाल घसरला असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ७०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १७ हजार ८०३ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार २१६ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.४७ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९.८६ टक्केने प्रमाण घटले आहे.
मंडळातून १६ हजार ७९९ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १५ हजार ३६५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४६ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ०.०१ ने वाढले आहे.मुलींचे प्रमाण जास्त संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५.२६ ने घटले आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.९९ टक्के अधिक आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेस बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ११ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ११ हजार २८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. १० हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९१.२४ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा ४.३४ टक्के इतका अधिक आहे.निकालाचा टक्का घसरलाकोकण विभागाने दहावीच्या निकालात बोर्डात उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असली तरी यावर्षी एकूण निकालाचा टक्का मात्र घसरला आहे. २०१२ मध्ये ९३.९४ टक्के, २०१३ मध्ये ९३.७९ टक्के, २०१४ मध्ये ९५.५७ टक्के, तर २०१५ मध्ये ९६.५४ टक्के, २०१६ मध्ये ९६.५६ टक्के, २०१७ मध्ये ९६.१८, २०१८ मध्ये ९६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ७.६२ टक्केने निकाल कमी असला तरी राज्यात सर्वोत्कृष्ट निकाल आहे. गेल्या आठ वर्षात २०१६ साली सर्वोच्च निकाल राहिला होता. कोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा असून ११४ परीक्षा केंद्र आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा आहेत. पैकी ९६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. २२० शाळांचा निकाल ९०.०१ ते ९९.९९ टक्के, २२३ शाळांचा निकाल ८०.०१ ते ९० टक्के, ६४ शाळांचा निकाल ७०.०१ ते ८० टक्के तर १९ शाळांचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे. सहा शाळांचा निकाल ५०.०१ ते ६० टक्के, एकमेव शाळा ४०.०१ ते ५० टक्के तर दोन शाळांचा निकाल ३०.०१ ते ४० टक्के इतका निकाल लागला आहे.विशेष गुणवत्तारत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे. ११ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणी, तर २ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळविली आहे.