रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचा क्रिश सिंग या विद्यार्थ्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या लेखी परीक्षेत यश मिळविले आहे उत्तीर्ण झालेल्या ७ हजार ७०० विद्यार्थ्यांमध्ये क्रिश याचा समावेश आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA नेशनल डिफेन्स अकादमी) परीक्षा हि भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या भारतीय सशत्र दलांसाठी उमेदवारांची भारती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते, विशेषतः एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होते.
शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ च्या सप्टेंबर महिन्यात घेतल्या गेलेल्या या परीक्षेत नवनिर्माण हायच्या इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत असलेला क्रिश हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत देशभरातून ३ लाख ६० हजार विध्यार्थी बसले होते त्यातून ७ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात क्रिशचा समावेश आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाते. उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि एस. एस.बी. मुलाखतीच्या निकालावर एकत्रितपणे आधारित असते. यशस्वी विध्यार्थ्याचे, नाविनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापिका नजमा मुजावर आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.