शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

‘हाॅटमिक्स’ डांबरीकरणामुळे कुंभार्ली घाट साेयीस्कर, आता आरामात करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 4:18 PM

मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती

संदीप बांद्रेचिपळूण : गेल्या अनेक वर्षांत प्रथमच चिपळूण तालुक्यातील संपूर्ण कुंभार्ली घाट चकाचक झाला आहे. मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती. या घाटातील सोनापात्र भागात रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हॉटमिक्स’ डांबरीकरण केल्याने प्रवास सोयीस्कर झाला आहे.गुहागर-विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १३ किलोमीटर लांबीच्या घाट रस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खबरदारी घेतली जाते. गतवर्षी मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र, अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात गेल्याने ते बुजले होते. शिवाय वाढलेल्या झाडीमुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता.पोफळीपासून काही अंतरावर असलेल्या सोनपात्राच्या ठिकाणी पूर्णतः रस्ता खचला होता. अनेकदा वाहने अडकून पडली होती. दोनवेळा पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अन्य ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले होते.यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार डांबरीकरण केले आहे. या डांबरीकरणासाठी घाट दोन दिवस बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवूनच घाटात डांबरीकरण केले. तसेच हेलवाक, पाटण या भागातही डांबरीकरण झाल्याने चिपळूण ते कराडचा प्रवास प्रथमच सुखकर झाला आहे.

२५ फुटांतील खड्ड्यांची ओरडचिपळूण ते कराडदरम्यान बहुतांशी ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आवश्यक तेथे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण झाले आहे. परंतु पिंपळी व शिरगावच्या सीमेवर केवळ २५ फूट रस्त्यातील डांबरीकरण शिल्लक आहे. या ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात ते आणखी धोकादायक बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किरकोळ कामाविषयी ओरड केली जात असून, हे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.

कुंभार्ली घाट आजच्या घडीला वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. संपूर्ण घाटात वाहतुकीसाठी कुठेही अडचण येणार नाही. पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांसह अन्य यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. - उत्तम कुमार मुळ्ये, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक