शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

कुंभार्ली घाटात दरडींचा धाेका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:23 AM

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील अतिशय खड्डेमय बनलेल्या दोन किलोमीटरच्या अंतरात नुकतेच हॉटमिक्स डांबरीकरण केले आहे. तसेच ...

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील अतिशय खड्डेमय बनलेल्या दोन किलोमीटरच्या अंतरात नुकतेच हॉटमिक्स डांबरीकरण केले आहे. तसेच उर्वरित भागात पॅचवर्क केल्यामुळे पावसाळ्यानिमित्त या घाटातील प्रवास काहीसा सुकर झाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला वर्षागणिक ठिसूळ बनत चाललेल्या दरडींचा धोका कायम आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील कुंभार्ली घाटात एका बाजूला प्रचंड दरी व दुसऱ्या बाजूला दरड आहे. १३ किलोमीटरचा वळणावळणाचा हा घाट आजही तितकासा सुरक्षित नाही. या घाटातून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे हा मार्ग सतत वाहतुकीने गजबजलेला असतो. दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. सततच्या रहदारीमुळे रस्त्यावरही त्याचा परिणाम होतो. कायम अवजड वाहने या मार्गाने ये - जा करत असल्याने दरवर्षी कुंभार्ली घाटातील रस्त्याची चाळण होते.

गतवर्षी या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे (एक ते दोन फुटांचे) खड्डे पडले होते. अक्षरशः कुंभार्ली घाट मृत्यूचा सापळा बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्याची दुरुस्तीच केलेली नव्हती. घाटातून उतरताना डाव्या बाजूला आणि रस्त्याकडेचा भाग वाहून गेल्याने येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. याविषयी पोफळी, शिरगाव येथील स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली.

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील मध्यवर्ती भागात अतिशय खड्डेमय बनलेल्या दोन किलोमीटरच्या अंतरावर डांबरीकरण केले आहे. त्याशिवाय सोनपात्रा येथील अवघड वळणावरील डांबर वाहून गेल्याने येथे मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा चुकवताना वाहने पलटी होण्याचा धोका अधिक होता. घाटात सुरक्षित रस्ता शोधताना वाहनचालक आपली दिशा सोडून विरोधी दिशेने गेल्याने वाहने समोरासमोर येऊन अपघात होत होते. याविषयीही मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर येथे उपाययोजना करण्यात आली आहे. या उपायांमुळे आता सोनपात्राच्या अवघड वळणावरील धोका काहीसा कमी झाला आहे.

-------------------

पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम असतो. २०१७-१८मध्ये याच घाटात एकाच दिवशी २४ ठिकाणी छोटया-मोठ्या दरडी कोसळल्याचा प्रकार घडला होता. तेव्हापासून येथे पावसाळ्यात पथकांतर्फे लक्ष ठेवले जाते. यावर्षीच्या पावसाळ्यातही सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक कर्मचारी व दोन मजूर यांच्यातर्फे लक्ष ठेवले जाणार आहे. शिवाय दोन जेसीबी व अन्य यंत्रणा तयार ठेवली आहे.

- उत्तम मुळ्ये, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण

-------------------------

घाटाची जबाबदारी नकोशी

गुहागर - विजापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असला, तरी पिंपळी ते घाटमाथा असा २२ किलोमीटरचा रस्ता आजही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देऊनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कुंभार्ली घाटाची जबाबदारी म्हणजे अवघड जागेचे दुखणे असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया जाणीवपूर्वक टाळली जात असल्याचे आता म्हटले जात आहे.

------------------------

पर्यटनाचा हॉटस्पॉट

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील कुंभार्ली घाट पावसाळी पर्यटनाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. प्रचंड पाऊस आणि जागोजागी कोसळणारे धबधबे हे येथील पर्यटनप्रेमींचे आकर्षण आहे. सर्वत्र हिरवागार गालिचा आणि रस्त्यालगत असलेला विविध रानफुलांचा सहवास अनेकांना मोहीत करतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या घाटात पर्यटनप्रेमींची गर्दी होते.

----------------------------

रुंदीकरणाची होतेय मागणी

पूर्वी परदेशी व्यापार समुद्रमार्गाने होत असल्याने कोकण किनाऱ्यावरील बंदरे पश्चिम महाराष्ट्राला सह्याद्रीच्या घाटमार्गाने जोडली गेली आहेत. हे घाट पूर्वी पायवाटेच्या स्वरूपात होते. जसजसे व्यापाराचे स्वरूप वाढले तसे त्यांचे रुंदीकरण झाले. ब्रिटिशांनी या घाटांमध्ये दुरुस्त्या केल्या. पण ब्रिटीश भारत सोडून गेल्यानंतर शासनाने याकडे गांभीर्याने पहिले नाही. आता या घाटांमधील धोकादायक वळणाच्या ठिकाणी काही प्रमाणात रुंदीकरण केले असले, तरी संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. मात्र, वाढत्या रहदारीमुळे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे.