शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

Ratnagiri News: आरक्षणासाठी कुणबी सेनेचा एल्गार, चिपळूणात विराट मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 3:22 PM

मोर्चात कुणबी समाजबांधवांचा जनसमुदाय लोटला

चिपळूण : आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, भूमिहीनांना न्याय द्या, बळीराजाला साथ द्या...  अशा गगनभेदी घोषणा देत कुणबी समाजाने अवघा परिसर दणाणून सोडला. कुणबी सेनेच्यावतीने सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात कुणबी समाजबांधवांचा जनसमुदाय लोटला होता. प्रांत कार्यालयावर मोर्चाने धडक देत आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोकणव्यापी कुणबी आरक्षण निर्धार परिषदेतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील काढलेल्या या मोर्चाला नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. त्यानंतर बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणा देत धडक मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर गेला. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना कुणबी सेनेच्या शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  या मोर्चात जिल्ह्यातील कुणबी समाजातील आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी कुणबी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बैकर, विलास खेराडे, कोकण प्रदेश अध्यक्ष सुरेश भायजे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ कातकर, मोपलवार समितीचे सदस्य ॲड. सुजीत झिमण, माजी सभापती सुरेश खापले, जिल्हा संघटक चंद्रकांत परवडी, जिल्हाप्रमुख विकास गुढेकर, जिल्हा सरचिटणीस प्रदीप उदेग, जिल्हा प्रवक्ते गजानन वाघे, चिपळूण तालुका प्रमुख संजय जाबरे, गुहागर तालुका संघटक दिलीप बने, संतोष गोमले, रमेश पांगत, मोपलवार समितीचे सदस्य दौलत पोस्टुरे, संगमेश्वर तालुका प्रमुख राजेंद्र धामणे, आरवलीचे पोलिस पाटील दत्ताराम लांबे आदी उपस्थित होते.  

मागण्या मान्य न झाल्यास यापुढील काळात कुणबी सेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

...या आहेत मागण्या

  • ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करून कुणबी समाजाची स्वतंत्र संख्या जाहीर करावी
  • ओबीसीमधून संख्येनुसार स्वतंत्र आरक्षण जाहीर करावे
  • मोपलवार समितीचा अहवाल घोषित करावा व बेदखल कुळांचा प्रश्न राज्यपालांच्या अद्यादेशाद्वारे सोडवावा
  • कोकणात छोट्या-मोठ्या धरणांची निर्मिती करून सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी व भाताला चार हजार रुपये हमीदर देण्यात यावा
  • ग्रामीण व नगरपालिका हद्दीत असलेल्या घरांच्या जमिनी तातडीने नावे कराव्यात
  • कोकणातील कुणबी समाजाला खास बाब म्हणून त्यांचे आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन सन १९८२ साली कै. श्यामराव पेजे यांनी शिफारस केल्याप्रमाणे घटनेचे कलम १५ (४), १६ (४) व ४६ अन्वये स्वतंत्र आरक्षण घोषित करावे
  • कै. श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची कार्यकक्षा महाराष्ट्रव्यापी करून ५०० कोटींचा निधी देऊन तत्काळ नेमणूक देण्यात यावी
  • बंद केलेला सातशे रुपयांचा बोनस पुन्हा सुरू करावा
  • कोकणात कृषी आधारित उद्योगाची निर्मिती करून रोजगार निर्मिती करावी
  • प्रदूषण करणारे कारखाने हद्दपार करावेत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीreservationआरक्षण