शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

लांजात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार

By admin | Published: May 02, 2016 11:15 PM

काळ्या ढगांकडे डोळे : केवळ एक टँकर आणखी किती लोकांची तहान भागवणार-- दुष्काळ दाह

अनिल कासारे-- लांजा -कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तालुक्यातील नद्या, विहिरी, तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिंचुर्टी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्ये पाण्याची झळ पोहोचली आहे, तर काही दिवसात ७ गावे १७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकच टँकर सध्या पाणीपुरवठा करत आहे.तालुक्यातील पूर्व भागातील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, या वाडी-वस्त्यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून टंचाईला सुरुवात होते. पाऊस पडेपर्यंत येथे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईची झळ पोहोचली आणि जिल्ह्यात पहिला टँकर धावला.सध्या पालू - चिंचुर्टी - धावडेवाडी येथे एकूण ४८ घरे असून, १५८ लोकवस्ती आहे. या घरांना दिनांक १७ मार्चपासून दररोज पालू हुंबरवणे - १०८ लोकवस्ती ४७ घरे, दिनांक ६ एप्रिलपासून एक दिवसाआड करून, कोचरी - भोजवाडी १२३ लोकवस्ती, ३५ घरे, दिनांक २२ मार्चपासून एक दिवसाआड, गोळवशी - खांबडवाडी २७२ लोकवस्ती, ६२ घरे यांना दिनांक २ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ६६१ लोकवस्ती असलेल्या १८२ घरांना सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.मार्च महिन्यापासून लांजा तालुक्यातील ३ गावे ४ वाड्या पाण्यासाठी वणवण करत असताना प्रशासनाकडून पाणीपुरवठा करणारा ५ हजार लीटरचा टँकर पाठवला जात आहे. चिंचुर्टीमध्ये दररोज, तर इतर ३ वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीमध्ये घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओळखून विवली - राईधनगरवाडी, गवाणे - रामाणेवाडी, कणगवली - शिंदेवाडी, पालू - नामेवाडी, पानली खालचीवाडी, वीसघर कमिटी, रामवाडी, दंडावरची वाडी, खाकेवाडी, गावकरवाडी, बौद्धवाडी, कोचरी - बेंंद्रेवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, डाफळेवाडी, धनगरवाडी, वाडगाव - हसोळ - कोंडवाडी एकूण ७ गावे १७ वाड्यांना मे महिन्यात पाणीटंचाई भीषण होणार असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे मागणीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पुढे १० गावे २१ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे गावांच्या संख्येत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ३ गावे ४ वाड्यांमध्येच पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र, ७ गावे १७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अधिक गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या एका टँकरने ३ गावांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. मात्र, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये वाढ होणार असल्याने एक टँकर एवढ्या गावामध्ये पाणीपुरवठा करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने अजून दोन टँकरची व्यवस्था करून पाणीटंचाईचे संकट दूर करावे, अशी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या नद्या, विहिरी, तलावांच्या पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कसे निपटावे, हीच चिंता लोकांना लागून राहिली आहे.