शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

आंबा वाहतुकीसाठी लालपरीही सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:32 AM

मुंबई उपनगरांसह अन्य जिल्ह्यांतही आंबा एसटीतून पोहोचविण्यात आला होता. या वर्षीही एसटीने आंबा वाहतुकीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ...

मुंबई उपनगरांसह अन्य जिल्ह्यांतही आंबा एसटीतून पोहोचविण्यात आला होता. या वर्षीही एसटीने आंबा वाहतुकीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्याही सज्ज झाल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच इतर जिल्ह्यामध्ये एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-१ किंवा ठाणे-२, भिवंडी, बोरीवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा, कोल्हापूरला आंबा पाठविता येणार आहे.

आंबापेटी वाहतुकीसाठी ३०० किलोमीटरपासून ते १,५०० किलोमीटरपर्यंत पाच डझन आंब्याच्या पुठ्ठ्याच्या पेटीसाठी ४० रुपयांपासून १९० रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. लाकडी पेटीसाठी ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येणार आहेत. दोन डझन पेटीसाठी २५ पासून ११० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसटीचे अधिकारी बागायतदारांशी सातत्याने संपर्क साधत असून, आंबा वाहतुकीसाठी आवाहन करीत आहेत.

थेट बागेतून वाहतूक

बागायतदारांशी संपर्क साधून थेट बागेतून आंबा पेट्या उचलण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी किमान ५० पेट्या एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. सध्या आंबा उत्पादन अल्प असल्याने मोठ्या प्रमाणात, शिवाय एकाच ठिकाणी एसटीला आंबा उपलब्ध होणे अशक्य आहे.

दरामध्ये फरक

खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटीचे वाहतूक भाडे किफायतशीर आहे. खासगी वाहतूकदार एक किंवा पाच दहाच्या पटीतील पेट्यांसाठी बागायतदार सांगतील, त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची तयारी दर्शवितात. मात्र, एसटी मालवाहतुकीसाठी काही निर्बंध आहेत. एकाच ठिकाणी जास्त पेट्या उपलब्ध असण्याची अट असल्यामुळे खासगी वाहतूकदारांकडे शेतकरी वळत आहेत.