लांजा : येथील युवासेनेतर्फे पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्याहस्ते करण्यात आले.
या शिबिरात लांजाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, देवरुखच्या उपनिरीक्षक विद्या पाटील, राजापूरच्या उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, प्राध्यापक महेश बावधनकर यांनी मार्गदर्शन केले. २१० विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, उप तालुकाप्रमुख दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, लीलाताई घडशी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, गटनेत्या पूर्वा मुळे, पाणी सभापती राजू हळदणकर, नगरसेवक लहू कांबळे, नगरसेवक नंदराज कुरूप, नगरसेविका वंदना कातगळकर, जिल्हा बँक संचालक गणेश लाखण, विभागप्रमुख शरद चरकरी, उपविभागप्रमुख चेतन खंदारे, विश्वास मांडवकर, सिद्धेश पांचाळ, युवासेना जिल्हा चिटणीस धनंजय गांधी, युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राहुल शिंदे, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, शहर अधिकारी पंढरीनाथ मायशेट्ये, उप तालुका युवाधिकारी जितेंद्र ब्रीद, लांजा तालुका कॉलेज युनिट अधिकारी अरबाज नेवरेकर, संतोष रेवाळे, विभाग युवाधिकारी सूरज कुरतडकर, रुपेश सुर्वे, हृषिकेश पांचाळ, प्रमोद गुरव, प्रसाद भाईशेट्ये, मोहन तोडकरी, अविनाश जाधव, युवासेनेचे उप तालुका समन्वयक संदीप सावंत, बापू लांजेकर, उपविभाग अधिकारी दिनेश गोंधळी, निलेश कातकर, किशोर अग्रे, सचिन पलांडे, सुबोध खामकर, सचिन नरसले, सचिन चव्हाण, रुपेश रेवाळे, उपशहर युवाधिकारी कुलदीप पाटील, अजय सावंत, अक्षय गांधी, दीपू जुवेकर, सूरज मालपेकर व मान्यवर उपस्थित होते.