चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६चा शुभारंभ शनिवार, ७ रोजी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्याशिवाय संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, खासदार विनायक राऊत, आमदार रामनाथ मोते, आमदार भास्कर जाधव, आमदार अनिल तटकरे, आमदार उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार संजय कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रधान सचिव महसूल मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव पर्यटन वल्सानायर सिंह, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया, जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.सकाळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. दि. ८ मे रोजी सकाळी ७ वाजता अॅरो मॉडेलिंग, ९ वाजता कराटे प्रात्यक्षिक, दुपारी ३ वाजता पाककला स्पर्धा, ५ वाजता कृषी पर्यटन या विषयावर चंद्रशेखर भडसावळे, संजीव अणेराव यांचा परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक लोककला, सायंकाळी ७ वाजता मुंबई युनिट विद्यापीठाचा महाराष्ट्र महोत्सव, पाककला स्पर्धा हा कार्यक्रम होईल. दि. ९ मे रोजी ९ वाजता कोवॅस जिम्नॅस्टिक, कोवॅस व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रदर्शन, ९.३० वाजता डॉग शो, दुपारी ३ वाजता पुष्परचना स्पर्धा, ४ वाजता व्याख्यान, ५ वाजता नितीन बानुगडे पाटील यांचे शिवचरित्र, सायंकाळी ६ वाजता सांगता समारंभ, सायंकाळी ७ वाजता सुदेश भोसले यांचा संगीत गौरव कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ चा आज (शुक्रवार) पासून शुभारंभ होत आहे. या महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर भगवान परशुराम मंदिराची प्रतिकृती कोरण्यात आली आहे.
पर्यटन महोत्सवाचा आज शुभारंभ
By admin | Published: May 07, 2016 12:17 AM