शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लोटे औद्योगिक वसाहतीत पाईपलाईनला गळती

By admin | Published: May 18, 2016 11:07 PM

लोटे परिसर : संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष

आवाशी : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या गर्तेत सापडले असून, अनेकांचे पाण्याविना हाल होत आहेत. लोटे-परशुराम वसाहत व परिसराला पाणीपुरवठा करणारी खेर्डी, चिपळूण एमआयडीसीची पाईपलाईनला मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी गळती लागली आहे, असे असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील १२ गावांना खेर्डी -चिपळूण येथील एमआयडीसीकडून वालोपे येथून वाशिष्ठी नदीतील पाणी पुरवले जाते. वाशिष्ठी नदीतील पाणी थेट पीरलोटे येथील एमआयडीसीच्या साठवण टाकीत येते. प्रथम त्याच्यावर प्रक्रिया करून ते कारखानदार व १२ गावांच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरवले जाते. रासायनिक कारखानदारीमुळे या १२ गावांमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत या गावातील जनतेनेदेखील पाण्याचा योग्य वापर करण्याचे सुरु केले आहे, तर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखानदारही पाण्याच्या वापरावर कटाक्ष ठेवून आहेत. फेब्रुवारीपासूनच येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनने जागरूकता म्हणून ठिकठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. प्रत्येक कारखानदाराच्या दालनात याविषयी पाट्या लावण्यात आल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, पुरवठादरापेक्षा वापरणारा दक्ष आहे. मात्र, पुरवठादाराला याचे काहीच सोयरसुतक नाही.ज्या ठिकाणाहून औद्योगिक वसाहत व गावांना पाणीपुरवठा केला जातो, तेथून म्हणजेच पीरलोटे येथून पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पीरलोटे येथील त्यांच्या पंप हाऊसमागे, महामार्ग पोलीस चौकी, पुष्कर कंपनीसमोर, सुप्रिया कंपनीसमोर, कन्साई कंपनीसमोर, बंद असणारी हरडेलिया कंपनी लगत व अशा अनेक ठिकाणी पाणी दिवसरात्र वाया जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दर सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असतो. मात्र, दुरुस्तीच्या दिवशी नेमके काय केले जाते, असा प्रश्न पडत आहे. दि. १६ रोजी सोमवार होता आणि मंगळवारीही पाणीपुरवठा बंद होता. मग असे असतानाही गळतीची ठिकाणे कामे तशीच राहावीत, असा सवाल उपस्थित होतो. याकामी जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथे होत असलेली पाण्याची गळती थांबवावीे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)तीव्र संताप : शेकडो लीटर पाणी वायाउर्वरित ठिकाणी भीषण पाणीटंचाई असताना लोटे परशुराम वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. दररोज शेकडो लिटर पाणी त्यामुळे वाया जात आहे. संबंधित यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याने हे लिकेज अद्याप तरी काढण्यात आलेले नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.