रत्नागिरी : मी जेव्हा मतदार संघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्या पासून ऊर्जा मिळते आणि त्या बळाबर मी काम काम करत असतो. अनेक कार्यकर्ते कधी कधी नाराज होतात. मात्र, माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते असतात त्यांना मी समानतेची वागणूक देतो हे ही विसरून चालणार नाही. पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे साेडून जाेरात काम करा, असा सल्ला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावाच्या ९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साेमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी तालुकाप्रमुख महेश म्हाप, सरपंच जानवी घाणेकर, उपतालुकाप्रमुख भिकाजी गावडे, आबा बंडबे, रमेश कसबेकर, पिंट्या साळवी, हर्षल पाटील, मिलिंद खानविलकर, श्रीकांत रानडे, देवदत्त पेंडसे तसेच इतर पदाधिकारी आणि खेडशीवासी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, खेडशी गावाच्या विकासासाठी तुमचा आमदार कटीबद्ध आहे. मी खेडशीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेडशी गावाच्या विकासासाठी तब्बल ९ कोटी ९१ लाखाचा निधी उपलब्ध करून देता आला. मी दिलेला शब्द पूर्ण केला आता खेडशीवासीयांचे आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय, असे ते म्हणाले. तुम्ही कार्यक्रमाला जी गर्दी केली त्या गर्दीने तुम्ही उदय सामंत यांचेच असल्याचे दाखवून दिला आहात.