लांजा : तालुक्यातील कुंभारवाडी येथील वहाळा शेजारी झाडामध्ये डुकरासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.सध्या रत्नागिरी जिल्ह्यात लोकवस्ती जवळ बिबट्या आढळल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. लोकवस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्या दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सकाळी काही गुराखी जनावरे घेऊन गेली असता कुंभारवाडी येथील वहाळात मृतावस्थेत बिबट्या दिसला. वहाळात डुकरासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत होते.हा बिबट्या अंदाजे दोन वर्षाचा असून, ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
लांजात फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 4:10 PM
leopard, forestdepartment, ratnagiri लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथील वहाळा शेजारी झाडामध्ये डुकरासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
ठळक मुद्दे डुकरासाठी लावलेली होती फासकीगुराख्यांनी पाहिला मृत बिबट्या