शहरं
Join us  
Trending Stories
1
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
3
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
4
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
5
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
6
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
7
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
8
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
9
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
10
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
11
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
12
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
13
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
14
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
15
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
16
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
17
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
18
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने
19
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
20
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी

चिपळूण, खेडमध्ये एकाचवेळी दोन बदुंकासह बिबट्याचे कातडे जप्त, चौघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 7:16 PM

चिपळूण : तालुक्यातील गुढेफाटा ते पाथर्डी रस्त्यावर मोटरसायकलने जाणाऱ्या तरूणांकडून एक सिंगल बॅरल बंदूक व बिबट्याचे कातडे जप्त करण्यात ...

चिपळूण : तालुक्यातील गुढेफाटा ते पाथर्डी रस्त्यावर मोटरसायकलने जाणाऱ्या तरूणांकडून एक सिंगल बॅरल बंदूक व बिबट्याचे कातडे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. याचवेळी खेड हद्दीतील मौजे मुरडे शिदेवाडी येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. याप्रकरणी केलेल्या चौकशीनंतर तळवटपाल उपाळेवाडी येथे छापा टाकून बंदूक निर्मीतीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.सचिन रामचंद्र साखरकर (३६, रा. डुगवे, साखरकरवाडी), प्रदेश प्रकाश बुदर (४०, बुदरवाडी गुढे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची परवाना नसलेली बंदूक फोल्ड केलेल्या स्थितीत आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी वन्यजीव सरंक्षणाच्या अनुशघाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यापुर्वी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून रत्नागिरी ग्रामिण, राजापूर, लांजा व गुहागर येथे कारवाया केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला चिपळूण तालुक्यातील गुढेफाटा येथे पाथर्डी रस्त्यावर दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन संशयास्पद तरूणांची मोटारसायकल थांबवली. त्यांच्या सॅकची तपासणी केली, त्यामध्ये बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची बंदूक व ४ जिवंत काडतुसे मिळाली. त्याप्रमाणे मोटारसायकलसह अन्य साहित्य जप्त केले आहे.या कारवाईत सहायक पोलिस फौजदार प्रशांत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळु पालकर, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर व दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. त्यांना वनविभागाचे दत्ताराम राजाराम सुर्वे यांनी मदत केलीदुसऱ्या घटनेत खेडचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे मुरडे शिंदेवाडी येथील सचिन संतोष गोठल (२३) याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. अधिक चौकशीअंती ही बंदूक पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री ( ५३, रा. तळवटपाल, उपाळेवाडी खेड) यांच्याकडून खरेदी केल्याचे समजले. त्याप्रमाणे सुतार  यांच्या घरावर छापा टाकला असता तेथे एक बंदूक व बंदूक निर्मीतीसाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त केले. त्यानुसार या दोघांवर पोलिस शिपाई संकेत गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, पोलिस निरीक्षक निशा जाधव याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, पोलिस हवालदार  विक्रम बुरॉडकर, संकेत गुरव, रोहित जोयशी, किरण चव्हाण यांनी कारवाई केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी