देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील बीएसएनएल टॉवर हा सर्वसामान्यांसाठी संपर्क वाहिनी आहे. तो सतत कार्यरत राहण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभे करू, असा इशारा धामापूर जिल्हा परिषद युवक विभाग अध्यक्ष अमोल नेटके यांनी दिला आहे.
खाडीपट्यातील सर्वसामान्य जनतेला तत्काळ संपर्क करता यावा या उद्देशाने उभा केलेला बीएसएनएल टॉवर सध्या विजेचे बिल न भरल्यामुळे अनेकदा खंडित केला जातो. गेले वर्षभर ही सेवा सततची खंडित होत राहिल्याने मोबाईलधारकांमधून नाराजी व्यक्त हाेत आहे. बीएसएनएल कंपनीला टॉवरचे बिल भरता येत नसेल तर ही सरकारची नामुष्की समजायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या ही सेवा अनेकदा बंद असल्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास कसा करावा हा प्रश्न पडलेला आहे. कर्मचारी, पोस्ट ऑफिस, विविध शासकीय कार्यालये, बँका, आदी कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.