लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रलेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, विषयाचे बंधन नाही.
या स्पर्धेसाठी शब्दसंख्या मर्यादा ७०० शब्द असून, पत्र मोबाईलवर टाईप करून स्पर्धा संयोजक प्रा. डॉ. महेश बावधनकर यांच्याकडे दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवायचे आहे. पत्रलेखन स्वतः केलेले असावे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५० रुपये, तृतीय क्रमांकाला ५०० रुपये व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रु. २५० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. महेश बावधनकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मराठी विभागप्रमुख डॉ. महेश बावधनकर, प्रा. सचिन गिजबिले, उपप्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण व प्राचार्य डॉ. अरविंद कुळकर्णी यांनी केले आहे.