शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

लोटे परिसरात विजेचा खेळखंडोबा

By admin | Published: September 07, 2014 9:43 PM

महावितरणबद्दल संताप : वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे

आवाशी : लोटे (ता. खेड) परिसराला महावितरणकडून होणारा वीजपुरवठा गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे अनेक गावांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. मात्र, यामध्ये सुधारणा होण्याऐवजी समस्याच अधिक भेडसावत आहेत.लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील आवाशी, गुणदे, लोटे, पिरलोटे, चिरणी, धामणदेवी, सोनगाव, घाणेखुंट, कोतवली, असगणी, लवेल, दाभीळ, सात्वीणगाव, मेटे यासह इतर गावांना लोटे महावितरणतर्फे वीजपुरवठा करण्यात येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या नावाखाली मे अखेरीस दुरुस्तीची कामे मोठ्या जोमाने हाती घेतली जातात. यावेळी संपूर्ण दिवसभर परिसर विजेविना कार्यरत असतो. औद्योगिक वसाहतीमुळे नागरिकांच्या सोयीसाठी असणाऱ्या बँका, पतसंस्था, निमशासकीय व खासगी कार्यालये यांना दैनंदिन कामकाज करताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.दरवर्षीच्या समस्येत सुधारणा होण्याऐवजी वाढ होताना दिसून येते. यावर्षीचा पाावसाळा सुरु झाल्यापासून इथल्या वीजवाहिन्या तुटणे, वीजगळती होणे, झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित होणे, कार्यालयाच्या जनित्रातच बिघाड होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. असे घडल्यास त्याची दुरुस्ती होण्यासाठी दोन दिवसांहून अधिक अवधी लागतो. याचा फटका छोटे व्यावसायिक, कार्यालये, उद्योजक यांना बसत आहे. व्यावसायिकांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत असून, संताप व्यक्त होत आहे. या परिस्थितीत सुधारणा कधी होणार, असा प्रश्न आहे.(वार्ताहर)