दापोली : सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सूर्यकांत दळवी यांनी गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपाचा प््राचार केला. यानंतर त्यांनी तटकरे यांना त्यांच्या घराचे दरवाजे खुले केले. अनेक जाहिर कार्यक्रमात त्यांना ज्यांनी पाडले, त्या आमदार संजय कदम यांच्या सोबत असतात.
यामुळे आता सूर्यकांत दळवी हा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांना आम्ही यापुढे अधिक किंमत देणार नाही. आता कुंकू कुणाचे लावायचे, मंगळसूत्र कुणाचे घालायचे व साडी कुणाची नेसायची हे त्यांनी ठरवावे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी यावेळी केली.मधुकर दळवी म्हणाले की, दुसऱ्या पक्षात गेलेल्या व पुन्हा शिवसेनेत आलेल्या मुंग्यांची आता वारूळे झाली आहेत. या मुंग्या आता एखादा गांडूळ वारूळाकडे कधी येतोय व आपण त्याला कधी फस्त करतोय, याची वाट पहात आहेत. मधुकर दळवी हे आपले सख्खे नातेवाईक नाहीत.
शिवाय पक्षात वेळवीतील एक मुंगी जरी आली, तरी रामदास कदम तिचे स्वागतच करतील, अशी प्रतिक्रिया मधुकर दळवी यांच्या शिवसेना पक्षपुनर्प्रवेशावर माजी आमदार व मधुकर दळवी यांचे भाऊ सूर्यकांत दळवी यांनी दिली होती, यावर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, राजकारणात माणूस अधोगतीकडे निघाला की त्याला नात्यांचा विसर पडतो. मी तर पुन्हा स्वगृही परत आलेलो आहे. यामुळे पक्षातील अनेक जेष्ठांना आनंद झाला आहे. सूर्यकांत दळवी यांना मात्र मी पक्षात आल्यावर नात्यांचा देखील विसर पडला आहे.ते राजकारण वेगवेगळे : रोहिणी दळवीमधुकर दळवी यांच्यामुळे मी राजकारणात आले, तो विषय फार वेगळा होता. माझ्या सासऱ्यांंनी माझ्या विजयाचा विषय प्रतिष्ठेचा बनवला व त्यामुळे मी निवडून आले. आता सूर्यकांत दळवी यांना मी त्यांची वहिनी नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. ते आमचे यापुर्वी कुटुंबप्रमुख होते, आज देखील आहेत व उद्या सुध्दा रहातील. राजकारण हे काही वर्षांचे असते. नाती मात्र अनंत काळाची असतात. यामुळे ते जरी नाते विसरले असले तरी आम्ही मात्र आमची नाती विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहिणी दळवी यांनी दिली.