रत्नागिरी : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात निश्चित झालेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. १३ पैकी अखिल भारत हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य धोंडू गावडे यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले. त्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिन्हांंचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या चिन्हांना उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले.
विविध पक्षांच्या उमेदवारांना दिलेले चिन्ह असे - मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष : किशोर वरक (बसपा) - हत्ती. नवीनचंद्र बांदिवडेकर (राष्ट्रीय काँग्रेस) : हात. विनायक राऊत (शिवसेना) : धनुष्यबाण. नोंदणीकृत राजकीय पक्ष - नीलेश राणे : रेफ्रिजरेटर. बी. के. पालकर (भारत मुक्ती मोर्चा) : खाट. मारूती जोशी (बहुजन वंचित आघाडी ) : शिट्टी. राजेश दिलीपकुमार जाधव (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी (बीआरएसपी) : एअर कंडिशनर. अॅड. संजय गांगनाईक (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष) : क्रेन. विनायक लवू राऊत (अपक्ष) : तुतारी, पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (अपक्ष) : गॅस सिलींडर. नीलेश भिकाजी भातडे (अपक्ष) : कपाट. नारायण दशरथ गवस (फणस). या उमेदवारांना निवडणूक निरीक्षक राहूल तिवारी यांनी मार्गदर्शन केले.